अस्वीकरण (Disclaimer)

नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) हे पोर्टल वापरण्यापूर्वी कृपया खालील अस्वीकरण (Disclaimer) काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या.

नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) या पोर्टलवर नोकरी व स्पर्धा परीक्षेशी संबंधित किंवा इतर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती काळजी आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला असला, तरी आम्ही या वेबसाईटवरील माहितीची पूर्णता, अचूकता, विश्वसनीयता, उपयुक्तता, किंवा उपलब्धतेची हमी देत नाही. या माहितीच्या आधारे घेतलेला कोणताही निर्णय, केला जाणारा वापर किंवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची कुठलीही जबाबदारी आमची नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) ही वेबसाईट स्वीकारत नाही. म्हणून आम्ही सल्ला देतो कि तुम्ही आमच्या वेबसाईटचा वापर तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर करावा आणि केवळ येथे उपलब्ध करून दिलेल्या माहितीवर अवलंबून राहू नये.  कोणत्याही अद्ययावत माहिती / विसंगती / तफावत / संभ्रम / शंका संदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने संबंधित माहिती अधिकृत संकेतस्थळावरून किंवा इतर उपलब्ध स्रोतामार्फात खा‍त्री / सत्यापित करावी व नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) या पोर्टलचा वापर आमच्या या अस्वीकरण (Disclaimer) आणि धोरणांच्या (Policies) अधीन राहून स्वतःच्या जबाबदारीवर करावा.

तुम्ही केलेला अर्ज हा संबंधित वेबसाईट मार्फत केला जातो, यामध्ये नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) या संकेतस्थळाचा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नाही.

नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) या संकेतस्थळावरील नोकरी व स्पर्धा परीक्षेशी संबंधित किंवा इतर माहिती विविध विभागाचे अधिकृत संकेतस्थळ किंवा इतर माध्यमातून संकलित केलेली असून, या संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे अस्वीकरण (Disclaimer) आणि धोरण (Policies) / नियम व अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता. मात्र हे अस्वीकरण (Disclaimer) आणि धोरण (Policies) / नियम व अटी तुम्हाला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नये.

या संकेतस्थळावरील माहितीच्या सत्यतेबाबत आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हि माहिती कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी खा‍त्री / शहानीशा करून माहिती सत्यापित करावी.

नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) हे संकेतस्थळ कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारात नाही. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचे नुकसान, खर्च, तोटा, दुष्परिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) हे संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.

नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) या संकेतस्थळावर अनेक ठिकाणी अन्य संकेतस्थळे / पोर्टलच्या लिंक दिलेल्या असून, त्यांची निर्मिती / देखभाल / व्यवस्थापन संबंधित संकेतस्थळ / पोर्टलच्या मार्फत केले जात असल्याने ते आमच्या नियंत्रणात नाहीत. सदरील लिंक केवळ तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या जातात, त्यामध्ये आम्ही कोणताही बदल किंवा सुधारणा करू शकत नाही.

जेव्हा तुम्ही आमच्या संकेतस्थळावरून बाह्य लिंक निवडता तेव्हा तुम्ही नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) या संकेतस्थळावरून बाहेर पडता, त्यामुळे तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण त्या बाह्य लिंक / संकेतस्थळाच्या मालकाकडे / प्रयोजकाकडे गेलेली असते. त्यामुळे सदरील बाह्य संकेतस्थळाची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण किंवा माहिती आणि विश्वसनीयता यासाठी नोकरी इन्फॉर्मेशन्स (https://mr.naukriinfos.com) हे संकेतस्थळ कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. तसेच त्याबद्दल तुम्ही ठरविलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. त्यामुळे या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंक / संकेतस्थळे / पोर्टलला आमचे समर्थन असेलच असे नाही.

आम्ही आमची वेबसाईट किंवा तिचा कोणताही भाग कोणत्याही वेळी सूचना न देता बदलण्याचा, निलंबित करण्याचा किवा बंद करण्याचा अधिकार राखून ठेवतो. तसेच आमच्या वेबसाईटशी संबंधित अस्वीकरण (Disclaimer) आणि गोपनीयता धोरण (Privacy Policies) / नियम व अटी कोणत्याही वेळी सूचना न देता बदलण्याचा देखील अधिकार आम्ही राखून ठेवतो.

Scroll to Top